अर्थबोध : ‘फायर’ एक सत्यकथा

ब्रिटनमधील ॲलन आणि केटी डोनेगन यांनी काटेकोर खर्च नियंत्रण, सातत्यपूर्ण बचत आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीच्या जोरावर वयाच्या चाळिशीपूर्वी आर्थिक स्वातंत्र्य मिळवले. ‘FIRE’ (Financial Independence, Retire Early) संकल्पना नेमकी काय आहे, जाणून घ्या.
FIRE Financial Independence Retire Early true story and investment lessons in Marathi

FIRE Financial Independence Retire Early true story and investment lessons in Marathi

Sakal

Updated on

डॉ. वीरेंद्र ताटके, गुंतवणूक विषयाचे अभ्यासक

थंडीचा कडाका वाढला, की ब्रिटनच्या अनेक भागांतील बहुतांश घरांमध्ये हिटर सुरू होतात. पण ॲलन आणि केटी डोनेगन यांच्या घरी मात्र वेगळंच चित्र असायचं. हिटर सुरू करण्याऐवजी ते अंगावर कपड्यांचे अनेक थर चढवायचे, गरम पाण्याच्या पिशव्या वापरायचे आणि विजेचा प्रत्येक युनिट जपून खर्च करायचे, जेणेकरून हिटरवर होणारा खर्च वाचेल. अनेकांना त्यांचा हा काटकसरीचा स्वभाव वेडेपणाच वाटायचा; पण ॲलन आणि केटी यांच्यासाठी हा केवळ खर्च कमी करण्याचा प्रयत्न नव्हता; ती त्यांच्या आयुष्याची मोठी रणनीती होती. त्यांचं एकच उद्दिष्ट होतं-‘फायर’ (FIRE – Financial Independence, Retire Early) अर्थात आर्थिक स्वातंत्र्याच्या मदतीने लवकर निवृत्ती. आयुष्यात ठरावीक वयानंतर आर्थिकदृष्ट्या इतके सक्षम व्हावं, की नोकरीवर फारसं अवलंबून राहण्याची गरज उरणार नाही आणि पारंपरिक निवृत्तीच्या वयाची वाट न पाहता स्वतःच्या अटींवर आयुष्य जगता येईल, अशी संकल्पना ‘फायर’ सांगते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com