
Bank vs Company Fixed Deposits: Which Is Safer for Retirees?
E sakal
विनायक ढवळे
vddhavale@yahoo.com
मुदत ठेव हा जोखीम नसलेला गुंतवणुकीचा पर्याय म्हणून प्रसिद्ध आहे; मात्र एकदम मोठी रक्कम हातात आली, तर ती सगळी रक्कम एकाच मुदत ठेवीत गुंतवणं योग्य ठरतं का?... मुदत ठेव ठेवताना नेमका काय आणि कसा विचार करणं फायद्याचं ठरतं, याविषयीचा हा माहितीपूर्ण संवाद...
‘‘प्रतापराव, थोडा वेळ आहे का? माझ्या एका मित्राला जरा माहिती हवीय. तुमचीच भेट हवी आहे.’’ धनंजयरावांनी विचारले.
‘‘काका, तुम्हाला मी नाही म्हणू शकत नाही. तुम्ही मित्राला घेऊन येऊ शकता.’’ प्रतापरावांनी मोकळ्या मनाने होकार दिला आणि तिकडे धनंजयकाकांच्या मित्राला खूप आनंद झाला. थोड्याच वेळात दोघेही प्रतापरावांच्या घरी पोहोचले.
‘‘प्रतापराव, हे माझे मित्र धनाजीराव. हे मागच्याच महिन्यात सेवानिवृत्त झाले. यांना बऱ्यापैकी रक्कम मिळाली आहे. त्यांना ही रक्कम बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवायची आहे. ती ठेवण्यापूर्वी तुमचा बहुमूल्य सल्ला त्यांना हवाय. आता पुढचं तेच तुमच्याशी बोलतील.’’
‘‘बोला धनाजीराव...’’
‘‘प्रतापराव, मला निवृत्तीनंतर जी रक्कम मिळाली आहे, त्या रकमेची एकच मुदत ठेव करून बँकेत दीर्घ मुदतीसाठी ठेवायची असा विचार आहे. बाकी काही नाही.’’