करकायदा : परदेशी मालमत्ता करा नियमित

प्राप्तिकर विभागाने 'AIS'मध्ये परदेशातील बँक खाती, गुंतवणूक आणि आर्थिक मालमत्तेची माहिती उपलब्ध करून दिली आहे. परदेशी मालमत्ता किंवा उत्पन्नाची माहिती पूर्वी जाहीर करणे राहून गेलेल्या करदात्यांसाठी ही महत्त्वाची संधी ठरू शकते.
How to disclose foreign assets through AIS under Income Tax in India Marathi

How to disclose foreign assets through AIS under Income Tax in India Marathi

Sakal

Updated on

डॉ. दिलीप सातभाई, ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट- सीए

भारतीय प्राप्तिकर विभागाने करप्रशासन अधिक पारदर्शक आणि माहिती-आधारित करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘एईओआय’ या जागतिक कराराअंतर्गत सुमारे ९० देश एकमेकांच्या नागरिकांची परदेशातील बँक खाती, गुंतवणूक, आर्थिक मालमत्ता आणि त्यातून मिळालेले उत्पन्न या माहितीची एकमेकांशी देवाणघेवाण करतात. आतापर्यंत ही माहिती केवळ प्राप्तिकर विभागाच्या अंतर्गत वापरासाठी होती. आता ती करदात्यांच्या ‘एआयएस’मध्ये ‘एफएआय’ या शीर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही माहिती वर्ष २०२२, २०२३ आणि २०२४ साठी उपलब्ध आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com