

Foreign Institutional Investors
esakal
अथर्व जोशी - ajoshi0448@gmail.com
सर्वसाधारणपणे शेअर बाजाराचा अभ्यास करताना, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (डीआयआय) आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (एफआयआय) हे दोन शब्द सतत कानावर येतात. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा मोठा बोलबाला असल्याचे अनेकदा दिसून येते. ते बाजारात येत असल्याचे दिसताच एका नवा उत्साह येतो. त्यांनी केलेली खरेदी-विक्री याचा शेअर बाजारावर मोठा परिणाम होतो. ‘एफआयआय’चे नेमके महत्त्व काय, सध्याची त्यांची भूमिका काय, याचा घेतलेला वेध...
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार अर्थात ‘एफआयआय’ म्हणजे परदेशातील अशा मोठ्या आर्थिक संस्था, ज्या भारतातील शेअर, बाँड किंवा इतर सिक्युरिटीमध्ये गुंतवणूक करतात. या संस्था थेट उद्योग चालवत नाहीत, तर आर्थिक परतावा मिळवण्यासाठी बाजारात पैसे गुंतवतात.