

France’s Secret Gold Strategy Revealed! How It Made ₹1.37 Lakh Crore Profit
eSakal
France Gold Strategy: जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असलेल्या फ्रान्सने अलीकडेच एक असे पाऊल उचलले आहे, ज्यामुळे जागतिक सोनं आणि अर्थबाजारात एका नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. अहवालानुसार, फ्रान्सने अमेरिकेत ठेवलेला आपला सोन्याचा साठा स्थलांतरित केला, परंतु हे काम जहाज किंवा विमानाने करण्यात आले नाही. यामागे एक स्मार्ट आणि धोरणात्मक आर्थिक नियोजन होते, ज्यामुळे केवळ वाहतुकीतील अडचणीच दूर झाल्या नाहीत, तर अंदाजे €12.8 अब्ज म्हणजेच अंदाजे 1,37,58,000,000,000 रुपये (1.37 लाख कोटी) इतका नफाही झाला.