
वसंत कुलकर्णी- ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार
कलिन इंडिया फ्लेक्सिकॅप फंड २९ ऑगस्ट २०२५ रोजी ३१ वा वर्धापनदिन साजरा करत आहे. जीएसटीतील सुधारणांच्या घोषणेमुळे बाजारातील अनेक विभागांमध्ये (लार्ज कॅप, मिड कॅप) वेगाने सुधारणा झाली असली, तरी लार्जकॅप शेअरचे मूल्यांकन आजही नव्याने गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक पातळीवर आहे, म्हणूनच लार्जकॅपकडे झुकलेला आणि मागील ३० वर्षांत १७.८९ टक्के वार्षिक परतावा देणारा फ्रॅंकलिन इंडिया फ्लेक्सि कॅप फंड सात वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीच्या उद्दिष्टांसाठी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी उत्तम आहे.