

Tobacco Excise Duty Hike
ESakal
१ फेब्रुवारीपासून तंबाखू उत्पादनांवर अतिरिक्त उत्पादन शुल्क आणि पान मसाल्यावरील आरोग्य उपकर लागू होईल. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, तंबाखू आणि पान मसाल्यावरील नवीन कर जीएसटी व्यतिरिक्त असतील. हे अशा हानिकारक उत्पादनांवर सध्या आकारल्या जाणाऱ्या भरपाई उपकराची जागा घेतील. सरकारी अधिसूचनेनुसार, १ फेब्रुवारीपासून, पान मसाला, सिगारेट, तंबाखू आणि तत्सम उत्पादनांवर ४० टक्के दराने जीएसटी आकारला जाईल. तर बिड्यांवर १८ टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारला जाईल.