

Garden Reach Shipbuilders Share Market Update Friday Close At 2413 Rupees Key Points For Investors To Watch
sakal
भूषण ओक, शेअर बाजार विश्लेषक
सध्याची जागतिक भू-राजकीय परिस्थिती अतिशय अस्थिर आहे, त्यामुळे सर्वच देश संरक्षणसज्जतेवर भर देत आहेत. जगाचा ९० टक्के व्यापार समुद्रातून चालतो कारण जमीन आणि हवेच्या मार्गापेक्षा समुद्री मार्ग व्यापारासाठी अत्यंत स्वस्त आणि म्हणून महत्त्वाचे आहेत. भविष्यातील युद्धतंत्रांमध्ये सागरी युद्धतंत्राचा प्रभाव निर्णायक ठरेल आणि थोडक्यात, सागरावर जो राज्य करेल तोच जगावर राज्य करेल.