

What does India’s 7.8% GDP growth really mean?
Sakal
मुकुंद अभ्यंकर, चार्टर्ड अकाउंटंट-सीए
चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीतील देशाचे वास्तविक एकूण देशांतर्गत उत्पादन वाढ अर्थात ‘जीडीपी’ ७.८ टक्क्यांनी वाढला, अशी आकडेवारी सरकारने नुकतीच जाहीर केली. मात्र, या आकडेवारीबाबत दोन आक्षेप घेण्यात आले आहेत. एक म्हणजे हा आकडा चुकीचा आहे आणि दुसरा आक्षेप म्हणजे प्रत्यक्षात अशी वाढ झाली असेल, तर सर्वसामान्य माणसाला रोजच्या जगण्यात ती कशी जाणवत नाही? त्यामुळे ‘जीडीपी’च्या या आकडेवारीमागचे नेमके वास्तव काय, हे जाणून घेणे सर्वांसाठी महत्त्वाचे आहे.