

Gems and jewellery exports Decline
ESakal
मुंबई : ऑक्टोबरमध्ये देशाची रत्ने आणि दागिन्यांची निर्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ३०.५७ टक्क्यांनी घसरून १९,१७२.८९० कोटी रुपयांवर आली आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये या क्षेत्राची एकूण निर्यात २६,२३७ कोटी रुपये होती, असे रत्ने आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेने (जीजेईपीसी) जाहीर केलेल्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.