Premium|H1b visa:‘जेन झी’चा प्रश्न, परदेशात शिकायचं की भारतातच भविष्य घडवायचं?

Indian students abroad : परदेशी नागरिकांना देण्यात येणाऱ्या एच वन बी व्हिसासाठीचे शुल्क जबरदस्त वाढवल्यामुळे अमेरिकेत जाण्यात अडथळे आलेत पण देशासाठी हे खरंच फायद्याचं की तोट्याचं?
H1B Fee Hike and Gen Z Dreams: India or America?

H1B Fee Hike and Gen Z Dreams: India or America?

ई सकाळ

Updated on

नेहा लिमये, कंपनी सेक्रेटरी

neha.a.limaye@gmail.com

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत नोकरीसाठी येणाऱ्या परदेशी नागरिकांना देण्यात येणाऱ्या एच वन बी व्हिसासाठीचे शुल्क जबरदस्त वाढविले आहे. हे प्रचंड शुल्क भरून कंपन्या आता भारतीयांना अमेरिकेत पाठवतील की नाही, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दुसरीकडे, भारताला याचा फायदाच होईल, असे म्हटले जाते. भारतातील हुशार तरुणवर्ग आता देशातच राहील, असे म्हटले जात आहे. या निर्णयाच्या परिणामांचा वेध...

अनिकेत : विहानचं हे अकरावीचं वर्ष. पुढच्या वर्षी बारावी. परवा घरी आल्यापासून एकच हट्ट घेऊन बसलाय... बारावीनंतर अमेरिकेला जायचं शिकायला आणि आम्ही दोघे त्याला केव्हाचे समजावतो आहोत की अरे, तुला जो कोर्स हवा आहे तो इथेही मिळतो आहे, आधी ग्रॅज्युएशन पूर्ण कर आणि मग कुठे जायचं तिथे जा. पण ही ‘जेन झी’ म्हणजे... यांना सगळं इन्स्टंट आणि ‘इन’, ‘ट्रेंड’मध्ये असलेलंच हवं असतं. म्हणजे तशी तयारी आहेच आमची. त्यानं परदेशात शिक्षण घ्यावं असं आम्हालाही वाटतं; पण सध्या सगळीकडून ज्या बातम्या येत आहेत... परदेशी शिक्षण म्हणजे काय खाऊ राहिलाय का? शिवाय आता आपलाही देश काही पूर्वीसारखा नाही. इथं कोणत्याही क्षेत्रात करियरला वाव नाही असं नाही, सगळ्या परदेशी शिक्षणसंस्था इथे येतायत आणि आपण मात्र तिकडे जायचं खूळ घेऊन बसतोय... आमचे राजे ऐकतच नाहीत... त्यावरून खडाजंगी झाली आणि विहान तिकडे जाणार म्हणून मनीषा आत्तापासूनच डोळ्यांना टिश्‍यू लावून बसली आहे! काय विचारू नको... इतका स्ट्रेस आलाय सगळ्याचा...

काय करतील हे दोघं? समजून घेण्यासाठी वाचा...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com