
अपूर्वा जोशी आणि मयूर जोशी
apurvapj@gmail.com
सध्या रशिया-युक्रेन युद्ध, इराण-इस्राईल युद्ध यामुळे भू-राजकीय तणाव वाढला आहे. त्यामुळे विविध देशांच्या आर्थिक, व्यापारी संबंधांवर परिणाम होत असून, या अस्थिरतेमुळे भारताला मात्र काही फायदे होत आहेत.
अमेरिकेसारख्या महासत्तांनी चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारतात उत्पादन करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
यासह अनेक संधी भारताला उपलब्ध होत आहेत, त्यामुळे जगातील वेगवान अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाणारी भारतीय अर्थव्यवस्था अशा आव्हानात्मक परिस्थितीतही आपला वेग टिकवून ठेवण्यात यश मिळवू शकेल.