GIFT City Investment: ‘गिफ्ट सिटी’ : गुंतवणुकीचा नवा मार्ग

GIFT City Gujarat A New Gateway to International Finance: ‘गिफ्ट सिटी’ म्हणजे काय? गुंतवणुकीसाठी गुजरातमधील या केंद्राकडे का पाहिले जाते?
GIFT City Gujarat Investment Guide How Indias Global Financial Hub Offers New Opportunities for Investors and Businesses

GIFT City Gujarat Investment Guide How Indias Global Financial Hub Offers New Opportunities for Investors and Businesses

sakal

Updated on: 

-मकरंद विपट, ‘सेबी’ रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट

सध्या भारतीय म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचा कल परदेशी शेअर बाजारांत गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडांकडे वाढत आहे. मात्र, परदेशातील गुंतवणुकीसाठी निर्धारित मर्यादा संपल्यामुळे अनेक म्युच्युअल फंडांनी त्यांच्या ग्लोबल फंडांमध्ये नवी गुंतवणूक स्वीकारणे थांबवले आहे. दुसरीकडे, अनिवासी भारतीयांना (एनआरआय) किंवा परदेशी नागरिकांना भारतीय म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करताना अनेक नियमांचे पालन करावे लागते. अशा परिस्थितीत गुजरातमध्ये उभारण्यात आलेले आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र अर्थात ‘आयएफएससी’ (इंटरनॅशनल फायनान्शिअल सर्व्हिसेस सेंटर) गुंतवणुकीचा एक पर्याय म्हणून पुढे आले आहे. ‘गिफ्ट सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या केंद्राच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करण्याच्या संधी उपलब्ध होतात. येथे गुंतवणुकीचे मुख्यतः दोन प्रकार दिसून येतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com