Premium|Gold Silver Investment Guide : सोने आणि चांदी घोडदौडीला लगाम...?

Precious Metals Market Analysis : सोने-चांदीच्या दरातील ऐतिहासिक चढ-उतार, जागतिक अनिश्चितता, डॉलरचे घसरते मूल्य आणि चांदीची औद्योगिक मागणी या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी पोर्टफोलिओमध्ये मौल्यवान धातूंचे संतुलन कसे राखावे, याचा तज्ज्ञ आशुतोष दाबके यांनी घेतलेला सखोल आढावा.
Precious Metals Market Analysis

Precious Metals Market Analysis

esakal

Updated on

आशुतोष दाबके - Ashutosh@wealthgrowth.in

अलीकडच्या काळात सोने-चांदी या मौल्यवान धातूंनी अतिशय वेगाने भाववाढ नोंदवून सर्वांनाच चकीत केले होते. गेल्या महिन्याच्या अखेरीस सोने-चांदीने आजवरची उच्चांकी भावपातळी गाठली खरी; पण पाठोपाठ जोरदार घसरणही नोंदविली. आता खाली आलेले भाव म्हणजे कमी भावामध्ये गुंतवणुकीची संधी आहे, की गेल्या दोन वर्षांपासून चालू असलेल्या भाववाढीच्या घोडदौडीला लगाम आहे, हे येणारा काळच ठरवेल.

जागतिक अर्थव्यवस्थांनी आणि रिझर्व्ह बँकांनी देशाचे चलन आणि सोन्याचा साठा यांच्यामधील संबंध म्हणजेच गोल्ड स्टॅंडर्ड संपवले, तेव्हापासून जेव्हा जेव्हा डॉलर कमकुवत झाला, त्या त्या वेळी सोन्याचे भाव वधारले आहेत. जेव्हा नोटास्वरूपी चलन म्हणजेच फियाट करन्सी अस्तित्वात नव्हती तेव्हापासून सोने आणि चांदी यांच्या नाण्यावर राजमुद्रा उमटवून त्यांचा वापर चलन म्हणून देवाण-घेवाणीसाठी होत होता. त्यामुळे या दोन्हीही धातूंना एक प्रकारे नगदी मूल्य (Monetary Value) प्राप्त आहे. सोने आणि चांदी याकडे स्टोअर ऑफ व्हॅल्यू म्हणूनही पाहिले जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com