Gold And Silver Prices Spike After Israel Iran War
Esakal
Sakal Money
Gold Silver Rate : युद्धाच्या वणव्याने सोने-चांदीच्या दराचा भडका, एका दिवसात मोठी वाढ
Gold Rate after israel iran war अमेरिका-इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर सोने-चांदीच्या दराचा भडका उडाला आहे. सोने-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Gold Silver Rates Jump As Middle East Conflict Intensifies अमेरिका, इस्त्राइलने इराणावर हल्ला केल्यानंतर मध्य पूर्वेत युद्धाची ठिणगी पडली आहे. युद्धजन्य तणाव तीव्र झाला असून इराणनेसुद्धा प्रत्युत्तरादाखल अमेरिकेच्या ८ लष्करी तळांना लक्ष्य केलंय. इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे दुबई, अबुधाबीसह कतार, इराकमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. यासोबतच इराणकडून होमुर्झची सामुद्रधुनी बंद करण्यात आल्यानं खनिज तेलासह जलवाहतूकीवर मोठा परिणाम होणार आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे सोने-चांदीच्या दराचाही भडका उडाला आहे.

