Premium|Gold Investment : सोन्यामध्ये नियमित गुंतवणूक यापुढेही फायदेशीर!

Saurabh Gadgil PNG Interview: ‘पीएनजी ज्वेलर्स’ कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांच्याशी ‘सकाळ मनी’चे संपादक मुकुंद लेले यांनी साधलेला हा संवाद...
Gold Investment

Gold Investment

E sakal

Updated on

मुकुंद लेले

mukundlelepune@gmail.com

ग्राहकांच्या मनात दीर्घकाळ विश्वासाची परंपरा जोपासणाऱ्या ‘पीएनजी ज्वेलर्स’ या ब्रँडचे रूपांतर वर्षभरापूर्वी कंपनीत झाले. ती शेअर बाजारांत नोंदली गेली आणि पहिल्याच वर्षी तिने कर्जमुक्त कंपनीचा दर्जा मिळवला. चालू आर्थिक वर्ष संपताना ९५०० कोटी रूपयांची उलाढाल व ३५० कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळण्याचा अंदाज आहे. कंपनीच्या विस्तार योजना, सोन्या-चांदीच्या भावाची वाटचाल आदी विविध विषयांवर ‘पीएनजी ज्वेलर्स’ कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांच्याशी ‘सकाळ मनी’चे संपादक मुकुंद लेले यांनी साधलेला हा संवाद...

प्रश्न : पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेड (पीएनजी ज्वेलर्स) ही कंपनी गेल्या वर्षी प्राथमिक समभागविक्री (आयपीओ) करून शेअर बाजारांत नोंदली गेली. नोंदणीच्या आधीची (प्री-लिस्टिंग) आणि नंतरची (पोस्ट-लिस्टिंग) स्थिती यात तुम्हाला कोणता फरक जाणवतो?

गाडगीळ : ‘पीएनजी ज्वेलर्स’ या ब्रँडला आजवर ग्राहकांच्या विश्वासानेच पुढे नेले आहे. पीएनजी ज्वेलर्स कंपनीची आयपीओनंतर गेल्या वर्षी १७ सप्टेंबरला भारतीय शेअर बाजारांत नोंदणी झाली. त्यानंतरच्या ११ महिन्यांत आपल्या दुकानांची संख्या ३६ वरुन ५६ पर्यंत वाढली आहे. खरेतर नव्या भांडवल उभारणीतून आम्ही पहिल्या वर्षात नऊ नवी दुकाने उघडण्याचे आश्वासन गुंतवणूकदारांना दिले होते.

प्रत्यक्षात ती संख्या २० झाली, ही समाधानाची गोष्ट आहे. फरक म्हणाल तर कार्यपद्धतीत काहीच नाही, कारण आपण कुठलाही मानसिक दबाव न घेता पूर्वीइतक्याच जबाबदारीने आजही काम करत आहोत. फक्त कामाचे स्वरुप मोठे आहे, व्याप मोठा झाला आहे. महत्त्वाची गोष्ट ही, की आता तुम्ही एकटे नसून, सोबत गुंतवणूकदारही आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायला लागते. तुम्ही काय करताय, किंवा व्यवसाय कसा सुरू आहे, ही माहिती गुंतवणूकदारांना हवी असते. कारण आपले भांडवल योग्य प्रकारे वापरले जात आहे का आणि त्याचा योग्य परतावा आपल्याला मिळत आहे का, याबाबत ते उत्सुक असतात. आम्ही दर तिमाहीला आमच्या सर्व गुंतवणूकदारांना एका सामाईक व्यासपीठाद्वारे अद्ययावत माहिती देतो. जे मोठे गुंतवणूकदार असतात त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष बैठका घेऊन त्यांना ही माहिती दिली जाते.

तुम्ही जे प्रगतीचे अंदाज वर्तवता त्यानुसार तुमची वाटचाल सुरू आहे का, हे ते तपासत असतात. एकप्रकारे विद्यार्थ्याच्या प्रगतीवर देखरेख करणाऱ्या दक्ष शिक्षकाचीच भूमिका ते बजावत असतात. आपले विचार आणि काम चांगले असेल तर संवादही नेहमीच चांगला राहतो.

पब्लिक लिमिटेड कंपनीबाबत एक चांगली गोष्ट म्हणजे तिचा एक प्लॅटफॉर्म तयार असतो, तिला भांडवलाची कमतरता पडत नाही, ब्रँड तयार होतो, दालनांची संख्या वाढते तसे बुद्धिमान लोक मिळत जातात, बाजारात तुमचे ब्रँडिंग आणखी खोलवर होते, बँका व वित्तीय संस्थांबरोबरचे तुमचे सहकार्य दृढ होत जाते. या शक्तीचा उपयोग तुमच्याप्रमाणे तुमच्या गुंतवणूकदारांना व सहयोगींनाही होत असतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com