
सोने की चांदी? २०२५ मध्ये कोण देईल जास्त परतावा?
E sakal
अमित मोडक, पीएनजी अँड सन्सचे संचालक-सीईओ
ceo.pngs@gmail.com
सध्या सोने-चांदीचे भाव वाढतच चालले आहेत. सोन्याचा भाव आता आणखी किती वाढणार, असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांना सतावत आहे. आपल्या देशात सोने हा पारंपरिक सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानला जातो, त्यामुळे शुभमुहूर्तावर सोनेखरेदी करण्याची परंपरा आहे. मात्र, सध्या सोन्याचा भाव गगनाला भिडल्यामुळे सणासुदीला किंवा लग्नसराईच्या हंगामामुळे सोनेखरेदी करण्याचा मानस असलेल्या नागरिकांना सोन्याचा भाव कमी होणार का आणि झाला तर कधी, असे प्रश्न पडत आहेत. सोन्याचा भाव नक्की कशामुळे वाढत आहे, याचा घेतलेला वेध.