
अमित मोडक
ceo.pngs@gmail.com
इराण-इस्त्राईलमध्ये सुरू झालेले युद्ध, होर्मुझ सागरी मार्ग बंद होण्याची भीती, अमेरिकेचे आयातशुल्क धोरण आणि त्यामुळे चीन आणि अन्य देशांबरोबरचे व्यापारयुद्ध, फेडरल रिझर्व्हचे पतधोरण, महागाईतील चढ-उतार, रशिया-युक्रेन सुरू असलेले युद्ध, आयात-निर्यातीवर होणारा परिणाम, अल्पकाळासाठी निर्माण झालेला भारत-पाकिस्तानमधील संघर्ष... अशा अनेकविध घडामोडींमुळे शेअर, रोखे आणि चलन बाजारात चढ-उतार दिसून येत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सुरक्षित पर्याय मानल्या जाणाऱ्या सोने-चांदीकडे वळवला. दोन्हींचे भाव सातत्याने वाढत असल्याचे दिसले. मात्र, नंतर जागतिक पातळीवर काहीशी स्थिरता दिसली, तशी त्यात थोडी घसरणही पाहायला मिळाली. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता सोने-चांदीत गुंतवणूक करावी की नको? केली तर कधी करावी? कधी नफा मिळवावा? असे प्रश्न त्यांना सतावत आहेत. या प्रश्नांची उत्तरे पीएनजी अँड सन्सचे सीईओ आणि कमोडिटीतज्ज्ञ अमित मोडक यांनी दिली आहेत.