

Gold Price
esakal
जळगाव: येथील सुवर्ण बाजारपेठ आता चांगलीच तेजीत आली आहे. गेल्या दहा दिवसांत सोन्याच्या भावात दहा हजार रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदीत २० हजारांची वाढ झाली आहे. १ ऑगस्टला सोन्याचा भाव एक लाख ४२ हजार ५०० (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) होता. मंगळवारी (ता. ११) सोन्याचा भाव एक लाख ५२ हजार होता. एकूण साडेनऊ हजार रुपयांची दहा दिवसांत वाढ झाली आहे.