

Gold-Silver Rate Fall: सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा घसरण झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून दोन्ही धातूंचे भाव सातत्याने वाढत होते. परंतु मंगळवारी हे भाव कमी झाले आहेत. विशेष म्हणजे चादीने सोमवारी सर्वोच्च दर गाठला होता. MCXवर चांदीचा भाव ४६०० रुपये प्रतिकिलोने कमी झालाय. तर सोनं प्रति ग्रॅम ११०० रुपयांनी स्वस्त झालं आहे.