Gold Rate Today
Gold Investment: सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी खुशखबर आहे. ऐन सणासुदीच्या काळामध्ये सोनं सव्वा लाखांच्या पुढे गेलेलं असताना शुक्रवारी सोन्याच्या भावामध्ये घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याची विक्रमी उच्चांकावरुन २६०० रुपयांची घसरण झाली आहे. दोन दिवसांच्या काळामध्ये ही घसरण बघायला मिळाली. तर चांदीच्या दरांमध्ये चार हजार रुपयांची घसरण झाली.