

Latest gold silver rates before new year
esakal
New Year Silver Gold Rate Forecast : वर्षाच्या अखेरीस सोने चांदीच्या दरात किंचीत घसरण झाली असली तरी सोने १ लाख ३५ हजारांच्या घरात आहे तर चांदी प्रतिकिलो २ लाख ३५ हजार ९२० रुपयांवर येऊन थांबली. दरम्यान मागच्या ४ दशकातील हा सर्वात उच्चांकी दर असल्याचे मत सोने चांदी व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून वाढलेली मागणी, तर आंतरराष्ट्रीय बाजार होत असलेली चढ-उतार, भू-राजकीय तणाव आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून करण्यात आलेल्या व्याजदर कपातीमुळे २०२५ सोने चांदीच्या दरासाठी ‘सुवर्णवर्ष’ ठरले.