Google Stock Crash: गुगलच्या शेअरमध्ये २० वर्षांतील सर्वात मोठी घसरण! का वाढलीय टेक कंपन्यांची चिंता?

Alphabet shares plunged over 12% wiping out about $500 billion in market value: जगातील आघाडीच्या टेक कंपन्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर अब्जावधी डॉलर खर्च करण्याची स्पर्धा सुरू आहे. मात्र, या गुंतवणुकीतून अपेक्षित नफा मिळेल का, याबाबत गुंतवणूकदार साशंक आहेत. गुगलची मातृ कंपनी असलेल्या अल्फाबेटच्या शेअरमधील मोठ्या घसरणीने ही चिंता अधिक गडद केली आहे.
Alphabet shares plunged over 12% wiping out about $500 billion in market value - AI Image

Alphabet shares plunged over 12% wiping out about $500 billion in market value - AI Image

esakal

Updated on: 

New York: गुगलची पेरेंट कंपनी असलेल्या अल्फाबेटच्या शेअरमध्ये २९ ऑक्टोबर रोजी १२ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. कंपनीच्या बाजारमूल्यात एका दिवसात सुमारे ५०० अब्ज डॉलरची घट झाली. दोन दशकांहून अधिक काळातील कंपनीच्या शेअरची ही सर्वात मोठी एकदिवसीय घसरण ठरली आहे. अल्फाबेटने तिमाही आर्थिक निकाल जाहीर झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी शेअरची मोठ्या प्रमाणात विक्री केली.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...