

Earn interest while supporting a greener economy
Sakal
सुधाकर कुलकर्णी, सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर-सीएफपी
पर्यावरण संवर्धनाला आता अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे याबाबत वेळोवेळी विविध माध्यमांतून चर्चा होताना दिसते. यासाठी सरकारी; तसेच खासगी पातळीवर विशेष प्रयत्न होताना दिसतात. काही सेवाभावी संस्थाही यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत. अशा या महत्त्वाच्या कामात जनसामान्यांनाही हातभार लावण्याची मनस्वी इच्छा असते. मात्र, नेमका सहभाग घेणे वैयक्तिक पातळीवर बऱ्याचदा शक्य होत नाही. परंतु, आता आपल्यालाही पर्यावरण संवर्धनाच्या कामात सहभागी होणे शक्य होणार आहे.