
GST in India
Sakal
अॅड. गोविंद पटवर्धन - ज्येष्ठ करसल्लागार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी वस्तू आणि सेवा कर अर्थात ‘जीएसटी’ रचनेतील बदलाची सुवार्ता दिली. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प यांच्या आयातशुल्कवाढीने ‘जीएसटी-२’ चर्चेला म्हणावे तसे स्थान मिळाले नव्हते. मात्र, तीन सप्टेंबर रोजी जीएसटी परिषदेने कररचनेत काही महत्त्वाचे बदल केले असून, त्याचे परिणाम काय होतील, हा चर्चेचा विषय आहे. आता जीएसटीचे दोनच टप्पे ठेवले आहेत, त्यामुळे वादाचे विषय कमी होतील, त्यामुळे ते स्वागतार्ह आहे.