
Experts hail GST exemption as a positive step towards economic growth and simplified taxation.
Sakal
मुकुंद लेले, संपादक
कें द्र सरकारने आयुर्विमा आणि आरोग्य विमा पॉलिसींच्या हप्त्यावर म्हणजेच प्रीमियमवरील वस्तू व सेवाकर (जीएसटी) काढून टाकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. ‘जीएसटी’तील या सवलतीचा लाभ विद्यमान; तसेच नव्या विमाधारकांपर्यंत पोचविण्याचे आवाहन सरकारने सर्व विमा कंपन्यांना केले आहे. हा बदल आजपासून म्हणजे २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणार असून, यामुळे विमा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल अपेक्षित आहेत.