Exporters to Benefit as Government Implements Key GST Reform
Sakal
Sakal Money
जीएसटी सुधारणांमुळे निर्यातदारांना दिलासा
Ease of Doing Business Boost: अमेरिकेने भारतावर आयातशुल्क व व्यापार निर्बंध घातलेले आहेत. भारतीय वस्तूंना अमेरिकेत स्पर्धा देण्यासाठी उत्पादन खर्च कमी करणे आवश्यक होते. त्यामुळे भारत सरकारने निर्यातदारांना जलद फायदा व्हावा म्हणून ९० टक्के परतावा त्वरित देण्याचा निर्णय घेतला.
-डॉ. दिलीप सातभाई, चार्टर्ड अकाउंटंट- सीए
भारतीय अर्थव्यवस्थेत निर्यातीची भूमिका महत्त्वाची आहे, हे लक्षात घेऊन वस्तू व सेवाकर अर्थात ‘जीएसटी’ परिषदेने सीजीएसटी नियम, २०१७ च्या नियम ९१(२) मध्ये सुधारणा करण्याची शिफारस केली आहे, जेणेकरून प्रणालीद्वारे जोखीम ओळखण्याच्या आणि मूल्यांकनाच्या आधारावर योग्य अधिकाऱ्याद्वारे तात्पुरत्या परताव्यापैकी ९० टक्के मंजुरीची तरतूद केली जाणार आहे. काही तरतुदींमध्ये बदल करून किंवा नव्याने मांडून करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. विशेषतः निर्यातीबाबतच्या तरतुदींमुळे निर्यातदारांना दिलासा मिळाला आहे. ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

