
Pipavav Port commodity market closes at Rs. 162 on Friday; latest trade rates updated.
Sakal
भूषण ओक, शेअर बाजार विश्लेषक
मेयार्स्क या डॅनिश शिपिंग कंपनीची उपकंपनी असलेल्या एपीएम पोर्ट कंपनीच्या मालकीची ही कंपनी गुजरातमधील पिपावाव बंदराच्या कार्यचालन व्यवसायात आहे. हेग, नेदरलँड्स येथे मुख्यालय असलेली एपीएम पोर्ट कंपनी ३८ देशांमध्ये बंदरे आणि टर्मिनल्स चालवते, त्यामुळे गुजरात पिपावाव पोर्ट या कंपनीला अद्ययावत तंत्रज्ञान आणि इतर देशांमधील सहकार्याचा लाभ मिळतो. या बंदरातून कंटेनर, ड्राय बल्क, द्राव्य आणि रोरो (रोल ऑन रोल आउट– मोटारगाड्या) अशा सर्व तऱ्हेच्या मालाची उलाढाल केली जाते. सध्याची अस्थिर भूराजकीय परिस्थिती आणि सागरी मार्गांतील अडथळ्यांमुळे कंटेनर आणि ड्राय बल्क उलाढालीत घट झाली. मात्र, लिक्विड आणि रोरो मालाच्या उलाढालीत वाढ दिसून आली. भविष्यात एलपीजी आयात वाढ अपेक्षित आहे; पण कंटेनर व ड्राय बल्क उलाढाल सुधारण्याची कमी शक्यता आहे. कंपनीला येत्या वर्षात लिक्विड आणि रोरो मालाच्या उलाढालीत अनुक्रमे २० टक्के आणि २५ टक्के वाढ व कार्यचालन मार्जिनमध्येही सध्याच्या ५८ टक्क्यांवरून ६०-६१ टक्क्यांपर्यंत वाढ अपेक्षित आहे.