
Tax Refund Delayed? Steps to Check Your Refund Status Online
Sakal
-अॅड.सुकृत देव, करसल्लागार
ज्या प्राप्तिकरदात्यांना लेखापरिक्षणाची गरज नाही त्यांच्यासाठी, आर्थिक वर्ष २०२४-२५ (आकारणी वर्ष २०२५-२६) साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत वाढवून १५ किंवा १६ सप्टेंबर २०२५ करण्यात आली होती. करविभागाच्या माहितीनुसार, मुदतीअखेर सात कोटी ६५ लाखांहून अधिक प्राप्तिकर विवरणपत्रे दाखल झाली आहेत. त्याचबरोबर अनेक करदात्यांना अवघ्या चार तासात परतावा मिळाला आहे, तर काहींना एका दिवसात परतावा मिळाला आहे. पूर्वी परतावा मिळण्यास तीन ते सहा महिने लागत.