

HBL Power Systems Share Analysis
sakal
भूषण ओक - शेअर बाजार विश्लेषक
हैदराबाद येथे मुख्यालय असलेल्या आणि १९८६ मध्ये स्थापन झालेल्या एचबीएल इंजिनिअरिंग कंपनीचा मुख्य व्यवसाय संरक्षण, रेल्वे आणि औद्योगिक क्षेत्रांसाठी खास प्रकारच्या बॅटऱ्यांचे उत्पादन आणि विशेष प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचा विकास, उत्पादन आणि पुरवठा हा आहे. निवडक क्षेत्रांमध्ये खास प्रकारची उच्च अभियांत्रिकी आणि उच्च गुणवत्तेची, मोठ्या मार्जिन्स मिळवून देणारी उत्पादने पुरविण्यावर तिचा भर आहे. ज्या क्षेत्रात खास उत्पादनांची आयात होते, तेथे अशी उत्पादने ती स्वतः विकसित करते. या दृष्टीने ही कंपनी बाकी अभियांत्रिकी कंपन्यांपेक्षा वेगळी आहे.