
डॉ. वीरेंद्र ताटके - गुंतवणूक विषयाचे अभ्यासक
‘एचडीएफसी टॉप १००’ म्युच्युअल फंडांचे नाव बदलून त्याचे नामकरण आता एचडीएफसी लार्ज कॅप फंड असे झाले आहे. एक जानेवारी २०२५ पासून हा बदल झाला आहे. भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार हा बदल झाला आहे; पण मुळात एखाद्या फंडाच्या नावात असा बदल का करावा लागत असेल, असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात येऊ शकतो. त्याचे उत्तर जाणून घेऊ या.