
Avoid These Mistakes While Buying Health Insurance for Seniors
सुनील टाकळकर
takalkars49@gmail.com
आपल्या देशात आता खासगी विमा क्षेत्रात अनेक कंपन्या दाखल झाल्या आहेत. यात अनेक कंपन्या आरोग्य विमा क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना ‘साही’ (STAND ALONE HEALTH INSURANCE COMPANY) कंपन्या म्हणतात. या कंपन्यांकडे आरोग्य विम्याच्या अनेक योजना उपलब्ध असतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी, तर त्यांच्या बजेटनुसार तीन ते चार योजना उपलब्ध असतात, त्यातून सोयीस्कर असा प्लॅन घेता येतो. त्यामुळे विमा कंपनीची निवड करताना आणि त्यांच्याकडून आरोग्य विमा पॉलिसी घेताना योजनांची नीट माहिती करून घेणे महत्त्वाचे ठरते.