शेअर बाजार : हिंदुस्थान एरोनॉटिक्स (शुक्रवार भाव बंद : रु. ४९१०)

एचएएलला संरक्षण मंत्रालयाचे अब्जावधींचे नवे करार; विक्रमी ऑर्डर बुकमुळे शेअरमध्ये तेजीचा ट्रेंड, तांत्रिक विश्लेषण खरेदीचे संकेत देतं
Hindustan Aeronautics (HAL): Strong defence order book and technical breakout signal potential upside

Hindustan Aeronautics (HAL): Strong defence order book and technical breakout signal potential upside

Sakal

Updated on

मकरंद विपट, ‘सेबी’ रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. अर्थात ‘एचएएल’ ही विमाने व हेलिकॉप्टरची निर्मिती, दुरुस्ती आणि देखभाल करणारी भारतातील संरक्षण क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. याशिवाय, ती विमाने व हेलिकॉप्टरसाठी लागणारी इंजिने आणि सुटे भागही तयार करते. अलीकडेच भारत सरकारने १२ ‘सु-३० एमकेआय’ लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी १३,५०० कोटी रुपयांचा आणि २४० ‘एएल-३१ एफपी’ एरो इंजिनांच्या पुरवठ्यासाठी २६,००० कोटी रुपयांचा स्वतंत्र करार ‘एचएएल’सोबत केला आहे. या करारांमुळे देशांतर्गत संरक्षण उत्पादनाला मोठी चालना मिळाली असून, कंपनीच्या विक्रमी ‘ऑर्डर बुक’चे मूल्य २.५४ लाख कोटी रुपयांहून अधिक झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com