
Don’t Let Medical Bills Break You: Smart Tips to Pick the Right Mediclaim Plan
शशांक चापेकर
सतत वाढणाऱ्या आरोग्यसेवेच्या खर्चामुळे, एखाद्या अचानक आजारपणाने किंवा अपघाताने तुमची आर्थिक स्थिरता धोक्यात येऊ शकते. म्हणूनच, तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी सर्वोत्तम आरोग्य विमा योजना असणे ही काळाची गरज आहे. परंतु, उपलब्ध असलेल्या असंख्य पॉलिसींमधून योग्य योजना निवडणे खूपच गोंधळात टाकणारे ठरू शकते. योग्य निर्णय घेण्यासाठी काही मदत करणारे मुद्दे या लेखात मांडले आहेत.
अलीकडच्या काळात वैद्यकीय उपचांराचा खर्च प्रचंड वाढला आहे. त्यामुळे अनेकदा घरातील एखादी व्यक्ती गंभीर आजारी पडल्यास संपूर्ण घराचे बजेट कोलमडून जाते. अनेकदा उपचारांसाठी पुरेसे पैसे नसल्याने कर्ज घ्यावे लागते. हे सर्व टाळण्यासाठी योग्य वेळी योग्य आरोग्य विमा घेणे महत्त्वाचे ठरते.