
Today Cash, Tomorrow Credit: A Timeless Business Lesson
E sakal
चकोर गांधी
chakorgandhi@gmail.com
आतापर्यंत आपण बॅलन्सशीटचे वेगवेगळे घटक पाहिले. त्यामध्ये ॲसेट बाजूला येणे असते, त्यालाच आपण धंद्यातील उधारी म्हणतो. उधारी खरंच ॲसेट आहे की लायबिलिटी, हे आपल्यावर अवलंबून असते. सर्व व्यवसाय-धंद्यांमध्ये हे खूप महत्त्वाचे असते. उधारीशिवाय व्यापार-धंदा होतच नाही, हे खरे असले, तरी ती किती, कशी, कोणत्या स्वरूपात असावी, हे महत्त्वाचे ठरते.
अनेक दुकानांमध्ये आपण एक पाटी कायम पाहतो, ती म्हणजे ‘आज रोख, उद्या उधार!’ याचा अर्थ असतो, उधारी मिळणार नाही. परंतु, तुम्हाला आश्चर्य वाटेल, काही धंदे फक्त उधारीवरच चालतात, तर काही धंदे कोणत्याही उधारीशिवाय चालतात. काही व्यापाऱ्यांना खूप उधारी असली, की बरे वाटते, तर काही जणांना उधारी वाढली तर झोप येत नाही. हे सर्व आपण कसा धंदा करतो व आपली मानसिकता कशी आहे, याच्यावर ठरते. एक निश्चित आहे खूप जास्त उधारी व न वसूल होणारी उधारी व बुडीत उधारी हे एखाद्या चांगल्या धंद्याची वाट लावू शकते.