
‘पैसा, पैसा करती है क्यू , पैसे पे तू मरती है?’ अशी ओळ असलेले हिंदी चित्रपटातील एक गाणे प्रसिद्ध आहे. आयुष्याच्या शेवटी आपण काहीही बरोबर घेऊन जात नाही, मग आयुष्य पणाला लावून संपत्ती कमवायची आणि आयुष्याचा कोणताही उपभोग न घेता संपून जाण्यात काहीही शहाणपणा नाही, हे सांगणाऱ्या अनेक गोष्टी आपण ऐकत, वाचत असतो; पण अनेकदा ते प्रत्यक्षात आणणे अनेकांना जमत नाही. मात्र, भरपूर पैसा कमावणे, तो वाढविणे आणि त्याचा उपभोगही घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.