
Coordination of Benefits Explained: Managing Multiple Health Covers
Step-by-Step Guide to Using Two Health Insurances Together
बालकृष्णन वेंकटारमणी
Balakrishnan.V@vensiva.in
राहुल आणि प्रिया, दोघंही मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये नोकरीला आहेत. दोघांनाही त्यांच्या कंपन्यांनी आरोग्य विमा दिलेला आहे. प्रिया आणि राहुल यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळाला आहे. अचानक एक दिवस प्रिया आजारी पडली. तिच्यावरील उपचारांचे बिल आठ लाख रुपये आले. त्यावेळी राहुलला आपले दोघांचे आरोग्य विमा वापरून हा सर्व खर्च सहज भागवला जाऊ शकतो. मात्र, हे शक्य आहे का? याबाबत त्याला माहिती नव्हती. यासाठी त्याने या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेतली. त्यांनी त्याला दोन आरोग्य विमा एकत्रितपणे कसे वापरता येतात, याची सविस्तर माहिती दिली.