
हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूटने त्यांची ग्लोबल रिच लिस्ट २०२५ जाहीर केली आहे. त्यानुसार, एचसीएलच्या अध्यक्षा रोशनी नादर यांनी जगातील १० श्रीमंत महिलांच्या यादीत आपले स्थान निर्माण करून इतिहास रचला आहे. या यादीत समाविष्ट होणारी त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. त्या जगातील पाचव्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला आहे. त्यांची एकूण संपत्ती ३.५ लाख कोटी रुपये आहे.