Stock Market : नव्या तेजीचा केंद्रबिंदू मिड व स्मॉल कॅप क्षेत्र

Indian stock market performance : भारतीय शेअर बाजारात लार्ज कॅप कंपन्यांची कामगिरी स्थिर असली, तरी मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांकडे बाजाराचा कल वळला आहे. यासाठी त्यांचे उत्पन्न आणि नफा वाढत आहेत. पुढील काळात मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांना फायदा होऊ शकतो.
Indian stock market performance

Indian stock market performance

sakal

Updated on

गौरव बोरा- शेअर बाजाराचे अभ्यासक-विश्लेषक

भारतीय शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांत लार्ज कॅप कंपन्यांनी स्थिर कामगिरी केली असली, तरी आता बाजाराचा कल हळूहळू मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांकडे वळताना दिसत आहे. गुंतवणूकदारांच्या चर्चांमध्ये आणि व्यवहारांमध्ये या क्षेत्रातील शेअरचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नव्या तेजीचा केंद्रबिंदू लार्ज कॅप कंपन्यांवरून मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांकडे सरकत असल्याचे चित्र दिसत आहे.

लार्ज कॅप कंपन्यांचे मूल्यांकन आधीच उच्चांकी पातळीवर पोचले आहे. त्यामुळे त्यामध्ये पुढील वाढ मर्यादित असू शकते. याउलट मिड कॅप आणि स्मॉल कॅप अनेक कंपन्या वाढीच्या टप्प्यावर आहेत. त्यांचे उत्पन्न आणि नफा वेगाने वाढत असल्याने गुंतवणूकदारांना अधिक परताव्याची अपेक्षा दिसत आहे. विशेषतः उत्पादन, संरक्षण, पायाभूत सुविधा, रसायन आणि निर्यातप्रधान उद्योगांमध्ये मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांना संधी मिळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com