
डॉ. वीरेंद्र ताटके
आयुष्यात अनेकदा संकटे येतात आणि त्यावर मात कशी करायची, हे त्यावेळी सुचत नाही. सर्वत्र अंधार दाटून आल्यासारखे वाटते, त्यातून बाहेर कसे पडायचे, हे कळत नाही. अशा वेळी डोकं आणि मन शांत ठेवून निर्णय घेतला, तर त्यातून मार्ग काढता येतो. आर्थिक नियोजनातदेखील काहीवेळा अशी संकटे येतात, एखाद्या गुंतवणुकीत मोठा तोटा दिसायला लागतो आणि त्यातून आपण बाहेरच पडणार नाही, अशी मनाची समजूत होते. अशावेळी आपण शांतचित्ताने निर्णय घेतल्यास आपण त्यातून बाहेर पडू शकतो आणि आपल्याला आर्थिक फटका बसत नाही.