

How Does the Income Tax Department Know Your Income Without ITR?
Sakal
प्रियांका कुलकर्णी, चार्टर्ड अकाउंटंट-सीए
‘‘माझ्याकडे पॅनकार्डच नाही, मी प्राप्तिकर विवरणपत्रही दाखल केलेले नाही. प्राप्तिकर विभागाच्या पोर्टलवर माझी नोंदणी नाही आणि ई-मेलही दिलेला नाही. मग प्राप्तिकर विभागाला माझे उत्पन्न कसे कळणार?’’ असे अनेकांना विशेषतः ज्यांनी आजपर्यंत प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केलेले नाही, त्यांना वाटते. प्राप्तिकर विभागाच्या नजरेत आपले आर्थिक व्यवहार येणारच नाहीत, असे अनेकांना वाटते. मात्र, डिजिटल व्यवहारांच्या आजच्या काळात हा समज चुकीचा ठरू शकतो. कारण प्राप्तिकर विभागाला तुमच्या उत्पन्नाची माहिती मिळण्यासाठी तुम्ही स्वतः प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केलेले असणे आवश्यक नाही. तुमच्या आर्थिक व्यवहारांची माहिती इतर व्यक्ती, संस्था किंवा विविध आर्थिक नोंदींच्या माध्यमातून विभागापर्यंत पोहोचू शकते.