

Mistakes in Mediclaim Applications Prove Costly for Policyholders
Sakal
ॲड. रोहित एरंडे, कायद्याचे जाणकार
कोणतीही मेडिक्लेम पॉलिसी घेताना, त्याचा अर्ज व्यवस्थित भरून देणे गरजेचे असते. यात प्रामुख्याने पॉलिसीधारकाने आपली प्रकृती, पूर्वीचे आजार यांची नीट आणि बिनचूक माहिती देणे आवश्यक असते. अनेकदा हे अर्ज नीट भरले नाहीत, पूर्वीच्या आजारांची माहिती दिली नाही म्हणून कंपनी दावा नाकारते आणि आजारपणातून सावरलेल्या लोकांना दुसरा धक्का बसतो. अशाच एका प्रकरणामध्ये राष्ट्रीय ग्राहक आयोगाने ग्राहकांच्या बाजूने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे, ज्याचा फायदा पॉलिसीधारकांना होऊ शकतो.