Permium|India Africa UAE Trade Corridor : आफ्रिकेशी व्यापार वाढवण्याचा भारताचा नवा डाव; बदलणार आर्थिक चित्र?

India Africa Economic Partnership : जागतिक व्यापारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारत, आफ्रिका आणि यूएई यांच्यातील नव्या व्यापार सेतूमुळे निर्यात, रोजगार, लॉजिस्टिक्स आणि भारतीय अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन विकासाची मोठी संधी निर्माण होणार आहे.
India Africa Economic Partnership

India Africa Economic Partnership

esakal

Updated on

डॉ. अनिल धनेश्वर - anil.dhaneshwar@gmail.com

जागतिक व्यापारातील वाढती अस्थिरता, युद्धजन्य परिस्थिती आणि अमेरिकेच्या संरक्षणवादी धोरणांमुळे अनेक विकसनशील देश आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत भारताने आफ्रिकी देशांसोबत व्यापारवृद्धीसाठी आखलेला ‘इंडिया-आफ्रिका-यूएई सेतू’ हा उपक्रम भारतीय अर्थव्यवस्थेसाठी नवी संधी ठरू शकतो. या माध्यमातून भारताला निर्यातवाढ, रोजगारनिर्मिती आणि जागतिक उत्पादनकेंद्र बनण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

सध्या विविध देशांमधील आंतरराष्ट्रीय व्यापार अत्यंत अस्थिर झाला आहे. जानेवारी २०२५ मध्ये अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सरकार सत्तेवर आल्यानंतर जागतिक व्यापार आणि सेवा क्षेत्रात अस्थिरता वाढली. परिणामी आयात-निर्यात व्यापार असंतुलित झाला असून, अनेक देश आर्थिक अडचणीत आले आहेत. याचा अर्थ अमेरिकेने जगातील अनेक देशांशी व्यापारात संघर्षात्मक भूमिका घेतली आहे. त्याचा परिणाम बेरोजगारी, महागाई, राहणीमान, सेवा क्षेत्र, पर्यटन, वैद्यकीय सेवा आणि सामाजिक संस्थांच्या अस्तित्वावर होत आहे. जगातील सुमारे ५० विकसित देश वगळता अनेक विकसनशील आणि अविकसित अर्थव्यवस्था अडचणीत आहेत. त्यात युद्धग्रस्त देशांची भर पडत आहे. अमेरिकेच्या प्रोत्साहनामुळे इराण-इस्राईल संघर्ष तीव्र झाला असून, त्यामुळे पश्‍चिम आशियातील सुमारे १० ते १२ देश अस्थिरतेच्या गर्तेत सापडले आहेत. पाकिस्तान-अफगाणिस्तान; तसेच रशिया-युक्रेन युद्धे अजूनही सुरूच आहेत. सुदैवाने श्रीलंका, नेपाळ आणि बांगलादेश या शेजारी देशांतील अस्थिरतेचे वातावरण कमी होत असून, ते भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी लाभदायक ठरू शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com