India economic growth : आनंदाची बातमी...जबाबदारीचीही जाणीव!

Indian economy : एसबीआय रिसर्च अहवालानुसार भारत २०३० पर्यंत उच्च-मध्यम उत्पन्न देश बनेल. आर्थिक सुधारणा, पायाभूत सुविधा, डिजिटल विस्तार आणि तरुण लोकसंख्येमुळे ही प्रगती शक्य झाली असली, तरी विषमता कमी करण्याचे आव्हान कायम आहे.
India economic growth

India economic growth

sakal

Updated on

डॉ. वीरेंद्र ताटके- गुंतवणूक विषयाचे अभ्यासक

सर्व भारतीय नागरिकांना आनंद वाटेल अशी एक बातमी एसबीआय रिसर्च संस्थेने अलीकडे प्रकाशित केलेल्या अहवालातून समोर आली आहे. या अहवालानुसार, भारत २०३० पर्यंत उच्च-मध्यम उत्पन्न देश होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. त्यावेळी देशाचे दरडोई उत्पन्न सुमारे ४,००० अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचण्याची आशा या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. अर्थात, हा टप्पा गाठण्यासाठी देशाला मोठा प्रवास करावा लागला आहे. कमी उत्पन्न गटातून बाहेर पडून वर्ष २००७ मध्ये निम्न मध्यम उत्पन्न गटात प्रवेश करण्यासाठी आपल्या देशाला तब्बल ६० वर्षे वाट पाहावी लागली. त्यानंतरचा प्रवास मात्र, तुलनेने वेगवान ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर, २०३० पर्यंत भारत उच्च मध्यम उत्पन्न गटात प्रवेश करेल, असे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com