Premium|Indian Economy : उद्योजकतेला बँकिंग क्षेत्राची कशी साथ मिळू शकते?

How Banking Supports India’s Growing MSME Sector : भारताच्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत एमएसएमई क्षेत्राचा वाटा महत्त्वाचा असून, उद्योजकतेला भांडवल, वित्तीय भागीदारी आणि आधुनिक बँकिंग सेवा देण्यात बँकिंग क्षेत्राची भूमिका निर्णायक ठरते.
Indian Economy

Indian Economy

esakal

Updated on: 

तन्वीर इनामदार - admin@muslimcooperative.bank.in

भारताची अर्थव्यवस्था वेगाने विस्तारत असताना या वाढीचा सर्वाधिक फायदा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) होत आहे. मात्र, कल्पनेपासून उद्योगापर्यंतचा प्रवास केवळ उद्योजकाच्या जिद्दीवर होत नाही; त्यासाठी वेळेवर मिळणारे भांडवल, विश्वासार्ह वित्तीय भागीदारी आणि आधुनिक बँकिंग सेवांचीही तितकीच गरज असते. भारताच्या आर्थिक प्रगतीत बँकांनी बजावलेली ही भूमिका अनेकदा दुर्लक्षित राहते.

आपण सध्या भारताच्या इतिहासातील संपत्तीनिर्मितीच्या सर्वांत मोठ्या पर्वांपैकी एका पर्वात जगत आहोत. खरेदीशक्ती समता (Purchasing Power Parity- PPP) या निकषानुसार भारत आज जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहे. आपल्यापुढे केवळ अमेरिका आणि चीन आहेत. भारत ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक उत्पादक ‘एमएसएमई’ क्षेत्रही भारतात आहे. ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. या यशामागे अनेक कारणे आहेत. लोकसंख्येची ताकद, वाढती पायाभूत सुविधा, डिजिटल क्रांती, सुधारित धोरणे आणि उद्योजकता यांचा त्यात मोठा वाटा आहे. मात्र, या सर्व कारणांचा विचार करताना एक महत्त्वाचा घटक अनेकदा दुर्लक्षित राहतो. तो म्हणजे बँकिंग क्षेत्र.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com