
भरत फाटक
bharat@wealthmanagers.co.in
भारतीय अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्षात वेगवान प्रगती करत, जगातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असा आपला नावलौकिक कायम ठेवेल, असा विश्वास भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालात व्यक्त केला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने जपानच्या एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) तुलनेत अधिक जीडीपी नोंदवत चौथ्या सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थेचा मान पटकावला आहे आणि लवकरच ती जर्मनीला मागे टाकत तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर भारताची ‘जीडीपी’ आणि पुढील वाटचाल याचा घेतलेला वेध...