

India gold demand falls 29 percent
esakal
India Gold Demand Falls 29 Percent: भारतात सोन्याच्या वाढत्या किमती आणि आयात शुल्काचा परिणाम आता सोन्याच्या खरेदीवर दिसू लागला आहे. जुलै ते सप्टेंबर २०२६ या तिसऱ्या तिमाहीत भारतातील सोन्याची मागणी वार्षिक तुलनेत २९ टक्क्यांनी घसरून १६२.५ टनांवर आली आहे. मागील वर्षी याच कालावधीत सोन्याची मागणी २२९.८ टन होती. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने (WGC) आज प्रसिद्ध केलेल्या 'Q3 2026 Gold Demand Trends' अहवालातून ही माहिती समोर आली.