

Rising Inflation
esakal
New Delhi: देशात येत्या काही महिन्यांत महागाई वाढण्याची शक्यता आहे. सणासुदीचा काळ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणे, लग्नसराईमुळे खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंची मागणी वाढणे, तसेच हवामानातील अनिश्चितता यामुळे वस्तूंच्या किमती वाढू शकतात, असा इशारा केंद्र सरकारच्या मासिक आर्थिक अहवालात देण्यात आला आहे. याचा थेट परिणाम सामान्य कुटुंबांच्या घरखर्चावर होऊ शकतो. किराणा खरेदी, कपडे, प्रवास आणि बाहेर जेवण यांसारख्या खर्चांसाठी अधिक पैसे मोजावे लागू शकतात. मात्र, सर्वच वस्तूंच्या किमती वाढतील असे नाही.