

India Retail Inflation Rises to 6.09 Percent in October 2026 (Image - AI Generated)
esakal
India inflation rate October 2026: सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईचा मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. अन्नधान्याच्या वाढत्या किमती आणि प्रतिकूल बेस इफेक्टमुळे ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाईने मोठी उसळी घेतली आहे. दोन वर्षांनंतर प्रथमच महागाईचा दर 6% च्या पुढे गेला आहे.
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (MoSPI) गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ग्राहक किंमत निर्देशांकावर (CPI) आधारित किरकोळ महागाईचा दर सप्टेंबरमधील 5.54% वरून वाढून ऑक्टोबरमध्ये 6.09% झाला आहे.