
Key Lending Trends in India
E sakal
देशातील कर्ज देण्याच्या पद्धतीचे सखोल विश्लेषण करणारा ‘हाऊ इंडिया लेंड्स’ हा अहवाल नुकताच ‘क्रीफ हाय मार्क’ या देशातील प्रमुख चारपैकी एक महत्त्वाचा क्रेडिट ब्यूरो असलेल्या ब्यूरोने प्रसिद्ध केला आहे. या अहवालात विविध कर्ज प्रकारांतील कल, कर्जांचा पोर्टफोलिओ आणि विविध कर्जप्रकारातील थकबाकी यांच्या विश्लेषणाचा समावेश आहे.
याबाबत ‘क्रीफ हाय मार्क इंडिया’चे अध्यक्ष आणि दक्षिण आशियासाठीचे प्रादेशिक व्यवस्थापकीय संचालक सचिन सेठ यांची खास ‘सकाळ मनी’साठी ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार वसंत कुलकर्णी यांनी घेतलेली ही मुलाखत...